टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे हे चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेत. खरमाटे यांच्यासोबत त्यांचे वकील हि ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले होते. खरमाटे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. खरमाटे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढणार आहेत, अशी चर्चा होत आहे.
ईडीने आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांना समन्स बजावलं होतं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणामध्ये खरमाटे यांना चौकशी बोलावलं आहे.
याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर घरावर छापे टाकले होते. या कारवाई दरम्यान, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने ईडीने आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार पत्रामध्ये परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केलाय. पाटील यांच्या तक्रारीनुसार, अनिल परब यांच्या सांगण्यावरून आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची मोठी रक्कम गोळा केली आहे.
अशाप्रकारे २५० ते ३०० कोटी रुपयांची वसुली झालीय. ही तक्रार १५ मे रोजी केली होती, ज्यात असे म्हटले आहे की या रॅकेटचा मास्टरमाईंड वर्धा येथे तैनात डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आहे.