टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – उत्तरप्रदेश राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमीत्ताने आम आदमी पक्षाने अयोंध्या, लखनौ आणि नॉयडा या भागातून तिरंगा यात्रेचे आयोजन केलं आहे.
ही यात्रा सप्टेंबर महिन्याच्या मध्याला काढणार आहे. यात्रेतील सहकारी अयोध्यात राम मंदिर परिसरातही जाणार आहेत. आग्रा आणि नॉयडा या ठिकाणी 1 सप्टेंबर रोजी ही यात्रा होणार आहे, अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी दिली आहे.
या यात्रांमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे सहभागी होणार आहेत. जातीयवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नागरीकांना एकत्र करणे हे या यात्रेचे उद्दीष्ट आहे असे संजय सिंह यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाने उत्तरप्रदेशातील निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी आता तेथे तयारी सुरू केलीय. हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.