TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 27 ऑगस्ट 2021 – स्टेट बँक ऑफ इंडिया (मुंबई) येथे सुमारे 69 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा लवकर भरण्यात येणार आहेत. या साठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

याद्वारे उपव्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार हि पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –

  1. उपव्यवस्थापक (Deputy Manager)
  2. संबंध व्यवस्थापक (Relationship Manager)
  3. उत्पादन व्यवस्थापक (Product Manager)
  4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
  5. सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार (Circle Defence Banking Advisor)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • उपव्यवस्थापक (Deputy Manager) – ग्रामीण व्यवस्थापनात MBA केलेले असावे.
  • संबंध व्यवस्थापक (Relationship Manager) – B.E./ B. Tech आणि MBA/PGDM केलेले असावे.
  • उत्पादन व्यवस्थापक (Product Manager) – B.E./ B. Tech आणि कम्प्युटरचं ज्ञान असावे.
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 02 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

या पदभरतीसाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा.