टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयायामध्ये चक्क दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून आलं आहे. विशेष म्हणजे मंत्रालयामध्ये जाणाऱ्या प्रत्येकीची कसून तपासणी करण्यात येते. तरीही दारूच्या बाटल्या आत गेल्या कशा? असा सर्वांना प्रश्न पडला आहे. हे दारू पिणारे कोण आहेत ? हा सुद्धा सर्वांना प्रश्न पडला आहे.
ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो. त्याच मंत्रालयामध्ये दारुंच्या बाटल्यांचा खच आज बघायला मिळाला आहे. दारुच्या बाटल्यांचा हा खच दिसून आल्याने मंत्रालयात प्रचंड खळबळ माजली आहे.
मंत्रालयामध्ये कडक बंदोबस्त असतो. तसेच ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, असे असताना दारुच्या बाटल्या आल्या तरी कशा? हा प्रश्न उपस्थीत झालाय.
या विषयीचे वृत्त पसरल्यावर लगेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तिथे पोचून दारूचा खच उचलायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी चौकशी होणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.