TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जुलै 2021 – अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राच्या जामीन अर्जाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे शिल्पा शेट्टीने आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलीय. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलीय.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी राज कुंद्रांच्या अडचणींत वाढ होत आहे.

राज कुंद्रांचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्रांच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिलाय.

त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेत ही याचिका दाखल केलीय. सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत केली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दाखल केलेल्या या याचिकेसोबतच अनेक उदाहरणे सादर केली आहेत. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये सुरू असलेल्या तपासावर तिने प्रतिक्रिया दिल्याची आणि या प्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केल्याची अनेक उदाहरणं तिने सादर केली आहेत.

अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात आहे. याबाबत मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी. २५ कोटी रूपयांची मानहानीची मागणी या याचिकेत केली आहे. तसेच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकावी, अशी विनंती केली आहे.

अश्लील चित्रपट प्रकरणापासून दूर असल्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवर कोणतीही खात्री न करता दिशाभूल करणाऱ्या वार्तांकनामुळे प्रतिमेचे नुकसान झाल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने या याचिकेत केला आहे. तसेचग यात अपराधी असल्याचे दाखवलं आहे. पती राज कुंद्रांवर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिलं आहे, असे देखील चुकीचं वार्तांकन केलं आहे, असे तिने यात म्हटलंय.

प्रसार माध्यमांनी चुकीचे, अपमानजनक, खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रकाशित केलं आहे. केवळ बदनामीच केली नाही तर आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप तिने या याचिकेमध्ये केलाय.

हे बदनामीकारक लेख व व्हिडिओंमुळे तिचे चाहते, अनुयायी, ब्रँड एंडॉर्समेंट कंपन्या, व्यवसायातील सहकारी आणि ज्यांनी आता या बदनामीकारक लेखांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केलीय. अशा लोकांच्या मनात तिची प्रतिष्ठा कमी झालीय, असे तिने या याचिकेत म्हटलं आहे.

तिच्या विरोधात प्रकाशित होणाऱ्या बदनामीकारक बातम्यांमुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांची प्रतिमा, तिची अल्पवयीन मुले व वृद्ध आई-वडील या सर्वांना द्वेष, उपहास आणि तिरस्कार सहन करावा लागत आहे. तिचे व्यवसायिक नुकसान झालं आहे, असे तिने या याचिकेत म्हटलं आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज