TOD Marathi

टिओडी मराठी, मीरा-भाईंदर, दि. 27 जुलै 2021 – मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

या पदभरतीत वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता हि पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.

आलेल्या अर्जातून थेट मुलखाती घेऊन निवड केली जाणार आहे. मुलाखतीची दिनांक 03 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती:

  • (Senior Drug Supervisor) औषधोपचार पर्यवेक्षक
  • (Tuberculosis Health Worker) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता

हि आहे शैक्षणिक पात्रता :

  1. (Senior Drug Supervisor) औषधोपचार पर्यवेक्षक – कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी टायपिंग आवश्यक आहे.
  2. (Tuberculosis Health Worker) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता :
मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प)

मुलाखतीची दिनांक – 03 ऑगस्ट 2021

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

सविस्तर माहितीठी अधिकृत वेबसाईटला (https://www.mbmc.gov.in/view/mr/recruitment) भेट द्या.

तसेच जाहिरातीचे नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.