टिओडी मराठी, मुंबई, दि. 22 जुलै 2021 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदविला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती.
परमबीर सिंह यांच्याविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्य सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याव र१०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटविल्यापासून ते सातत्याने चर्चेत आले आहेत. उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केला होता.
देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले आहे, असा आरोप सिंह यांनी केला होता. सिंह तेव्हापासून सातत्याने चर्चेच्या वर्तुळामध्ये आहेत.
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आठ जणांची नावे एफआयआरमध्ये दिली आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
या व्यावसायिकाने तक्रारीमध्ये आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप केला आहे.
पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १०९, ११०, १११, ११३, १२० (ब), १६६, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७ नुसार गुन्हा दाखल केलाय.
A case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file pic), at Marine Drive Police Station. Complainant is a businessman. FIR names a total of 8 people,incl 6 Police personnel. Two civilians arrested in this matter so far: Mumbai Police pic.twitter.com/2tHMbIB7Wg
— ANI (@ANI) July 22, 2021