टिओडी मराठी, दि. 18 जून 2021 – आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ पांढरं हरीण आढळलं आहे. हे हरीण एका कॅमेरात कैद झालं आहे. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकांना विश्वासही बसत नाही कि, हरणाचा रंगही पांढरा आहे. अनेकांनी ट्विटरवर लिहिले की, त्यांनी पहिल्यांचा पांढऱ्या रंगाचं हरीण पाहिलंय. कारण, सामान्यपणे हरणांचा रंग भुरका असतो.
हा दुर्मिळ फोटो IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. आतापर्यंत या फोटोला १५०० पेक्षा अधिक लाइक्स आणि साधारण १५० पेक्षा अधिक रिट्विट मिळालेत.
हा फोटो अधिकारी सुशांता नंदा यांनी गुरूवारी ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी सांगितलं की, काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ पांढरा हॉग हरीण दिसलं. हा दुर्मिळ व अद्भुत फोटो जयंत कुमार सरमा यांनी क्लिक केलाय.
एका न्यूज एजन्सीनुसार, काझीरंगा नॅशनल पार्कचे डीएफओ रमेश गोगोई म्हणाले की, या दुर्मिळ पांढऱ्या हरणाला काही दिवसांअगोदर पार्कमध्ये पाहण्यात आलं होतं. हे हरीण कधी पार्कच्या बाहेर जातं तर दुसऱ्या हरणांसोबत फिरतं आणि गवत खातं.
डीएफओ रमेश गोगोई म्हणाले की, हरणाचा पांढरा रंग पूर्णपणे आनुवांशिक आहे. जो जीनमध्ये काही बदलांमुळे होतो. हे हरीण वेगळ्या प्रजातीचं नाव नाही. काझीरंगा नॅशनल पार्कमद्ये एकूण ४० हजार हॉग हरणांपैकी एक किंवा दोन प्रकारचे दुर्मिळ पांढरे हरीण आढळू शकतात.
A rare white hog deer in Kaziranga National Park
🎥Jayanta Kumar Sarma pic.twitter.com/MS9v0vFFVA— Susanta Nanda (@susantananda3) June 17, 2021