टिओडी मराठी, लंडन, दि. 15 जून 2021 – भारतात देखील कोरोना रुग्ण शोधण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ ॲपचा वापर केला आहे. याचप्रमाणे ब्रिटनमधील काही शास्त्रज्ञांनी अशा अनोख्या उपकरणाचा शोध लावलाय. ज्याच्या सहाय्याने करोना रुग्णाचा केवळ 15 मिनिटामध्ये शोध घेणे शक्य होणार आहे.
एखाद्या खोलीत विविध व्यक्ती जर जमले असतील तर त्या व्यक्तीपैकी कोणी जर करोनाग्रस्त असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल. पंधरा मिनिटात ही गोष्ट समोर येईल, खोलीचा आकार मोठा असेल तर, मात्र ही गोष्ट समजण्यासाठी अर्धा तास लागेल. आगामी कालावधीत विमानातील केबिन क्लास रूम केअर सेन्टर्स घर आणि कार्यालयांत हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
उपकरणाचे नाव कोविड अलार्म असे ठेवले आहे. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्मपेक्षा हे उपकरण थोडे मोठे आहे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन व डरहम युनिवरसिटी या 2 संस्थांमधील वैज्ञानिकानी संयुक्तपणे प्रयोग करून या संशोधनात यश मिळवले आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा चाचणी केली तेव्हा त्याचे निष्कर्ष 98 ते शंभर टक्के खरे आलेत.
कोरोना रोग शोधण्यासाठी सध्या आर्टिपीसीआर व एंटीजन टेस्ट या 2 चाचण्या वापरल्या जातात. पण, त्यापेक्षाही ही अलार्म सिस्टीम अधिक प्रभावी असल्याचा संशोधकांनी दावा केलाय.
एखाद्या खोलीमध्ये असलेल्या विविध व्यक्तीं पैकी कोणाला करोनाचे संक्रमण झाले आहे, हे शोधण्यासाठी मात्र पुन्हा एकदा चाचणी करून घ्यावी लागतेय.
डरहॅम युनिव्हर्सिटीतील बायोसायन्स प्रोफेसर लिंडसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रत्येक रोगाचा एक स्वतंत्र असा वास असतो. त्या वासाच्या सहाय्याने रुग्णांचा शोध घेणे शक्य आहे. यासाठी हे उपकरण विकसित केले आहे. त्याची किंमत केवळ 5 लाख 15 हजार रुपये आहे.