टिओडी मराठी, जोहान्सबर्ग, दि. 12 जून 2021 – 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महात्मा गांधींच्या 56 वर्षीय पणतीला डर्बन कोर्टाने 7 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लता रामगोबिन असे महात्मा गांधींच्या पणतीचे नाव आहे. सोमवारी न्यायालयाने आशिष लता रामगोबिन यांना दोषी ठरविले.
व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची 62 लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते, असे फसवणूक झालेल्या एसआर महाराज यांनी सांगितले आहे.
लता यांच्यावर उद्योजक एसआर महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. लताला माल आयात करण्यासाठी आणि सीमाशुल्क भरण्यासाठी महाराजांनी सुमारे ६० लाख रुपये दिले होते. पण, असा कोणताही माल महाराजा यांच्याकडे पोहोचविण्यात आला नाही. लता यांनी आश्वासन दिले होते की, या नफ्यातील काही भाग ती एसआर महाराज यांना देणार आहे.
प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची लता रामगोबिन मुलगी आहे. डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने लता यांना शिक्षा सुनावल्यानंतर अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती.
लता रामगोबिन यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर वितरकांचे संचालक महाराज यांची भेट घेतली आहे, अशी माहिती कोर्टाला सोमवारी दिली आहे.
कपडे, बुटांची निर्मिती, विक्री व आयात महाराज यांची कंपनी करते. महाराज यांची अन्य कंपन्यांना नफा-समभागांच्या आधारे पैसे देखील देते. दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी तागाचे 3 कंटेनर आयात केले आहे, अशीही माहिती लता रामगोबिन यांनी महाराजा यांना दिली होती.
आपल्याकडे आयात खर्च आणि सीमा शुल्क भरण्यासाठी पैशाची कमतरता आहे. तसेच बंदरावरुन सामान खाली उतरवण्यासाठी पैशांची गरज असल्याचे लता यांनी महाराजा यांना सांगितल्यानंतर लताने महाराज यांना सांगितले की, तिला ६२ लाख रुपयांची गरज आहे.
तसेचते सिद्ध करण्यासाठी लताने वस्तू खरेदी केला असलेला एक कागद महाराज यांना पाठविला होता. त्यानंतर हा कागद खोटा आहे, असे समोर आल्यानंतर महाराज यांनी लता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.