Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi - लोकांकडून लोकांसाठी टॉप मराठी बातम्या

TOD Marathi

DRDO ने आजपासून लॉन्च केलं 2-डीजी अँटी कोविड औषध; 10 हजार डोस दिला रुग्णांना

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 मे 2021 – कोरोनावर अँटी-कोविड औषध म्हणून 2-DG भारतीय शास्त्रज्ज्ञांनी बनवलेलं औषध आजपासून मार्केटमध्ये उपलब्ध झालं आहे. हे औषध कोरोना साथ नियंत्रणात आणण्यात प्रभावी ठरू शकतं, असा दावा व्यक्त केला आहे. DRDO च्या शास्त्रज्ज्ञांच्या रिसर्च आणि परिश्रमानंतर भारताने कोरोनाविरोधात हे औषध तयार केलंय. यातून लोकांना दिलासा मिळण्याची आशा आहे. सोमवारी या औषधाच्या 10 हजार डोसची पहिली खेप लॉन्च केली असून आता हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जातंय.

याबाबत DRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे औषध रुग्णांना लवकर बरं करण्यासाठी मदत करत आहे. तसेच त्यांची ऑक्सिजनवरील निर्भरता बरीच कमी करतं. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आज म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला 2-DG औषधाच्या 10,000 डोसची पहिली खेप लॉन्च केली असून ते रुग्णांना हे दिलंय. याचं उत्पादन वाढवण्यासाठी निर्माते काम करत आहेत. हे औषध डॉक्टर नंतर नारायण भट्ट यांच्यासह शास्त्रज्ज्ञांच्या एका टीमने बनवलं आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये या औषधांचे खूप चांगले परिणाम दिसले आहेत. मे ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ट्रायलमध्ये या औषधाने कोरोना रुग्णांवर चांगलं काम केलं. तसेच ते सुरक्षित देखील ठरलं.

या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे झालेत. त्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरजही पडली नाही. हे औषध कोरोनाला जागीच थांबवतंय आणि त्याचा प्रसार रोखतं. हे औषध एकप्रकारचं सूडो ग्लूकोज मोलेकल आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे

ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 8 मे रोजी डीआरडीओने विकसित केलेल्या अँटी कोविड औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिलीय. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणे असणा-या रूग्णांच्या उपचारासाठी या औषधास उपयुक्त पद्धत म्हणून परवानगी आहे.

2-डीजी औषध पाकीटात पावडर स्वरूपात येते. हे औषध पाण्यात मिसळून प्यावे. कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर 2 डीजी या औषधाचे उपचार केले आहेत. यात असे दिसले कि, ते रुग्ण साधारण वेळेपेक्षा लवकर बरे झालेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज