वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Opposition leader Ajit Pawar on the statement of Minister Mangalprabhat Lodha) पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमनास्पद वक्तव्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चूक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे? असा संतप्त प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. (Ajit Pawar questioned on such things)
एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे…जनता यांना योग्य जागा दाखवेल, असेही ते म्हणाले.