शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या काही काळात झालेल्या घडामोडींवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या पत्रकार परिषदेत बोलण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेसंदर्भात उद्धव ठाकरे अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर बोलतील, अशा स्वरूपाचे ट्विट देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे (Thackeray Group MP Sanjay Raut Twitte).राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी केलेलं विधान महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलेलं विधान या सगळ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) या युतीबद्दलही ते बोलण्याची शक्यता आहे. आगामी काळात विविध महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांच्या संदर्भात ही युती खूप महत्त्वाची असणार आहे. त्यासोबतच नुकताच आदित्य ठाकरे यांचा बिहार दौरा झालेला आहे (Aditya Thackeray has visited Bihar). या बिहार दौऱ्यात त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट घेतली होती (During this Bihar visit, he also met Bihar Chief Minister Nitish Kumar, Deputy Chief Minister Tejashwi Yadav). आदित्य ठाकरेंच्या या भेटीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोचरी टीका केली होती. या सगळ्या संदर्भातही उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत काय बोलतात किंवा काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे.