मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आरोग्य विषयक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. (MNS Chief Raj Thackeray met CM Eknath Shinde) याप्रसंगी राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी तळमळीने काही सूचना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सुचवलेल्या एका उपायाचा लाईव्ह डेमो देखील या बैठकीत दाखवण्यात आला. त्यांनी सुचवलेल्या या पर्यायांचा आरोग्य व्यवस्थेत नक्की समावेश करण्याबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, (Health Minister Tanaji Sawant) सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव संजय खंदारे, राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियान आरोग्य सेवा संचालक तुकाराम मुंढे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना, आरोग्य विभागातील सर्व प्रमुख वरिष्ठ अधिकारी तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आरोग्यविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असं असलं तरी यानिमित्ताने पुढील काळात राजकारणात काही नवी समीकरणांविषयी चर्चा झाली असेल का? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात आली. त्यातच काहीच दिवसांसमोर अंधेरी पोट निवडणूक आहे. गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्यासमवेत तिसरी भेट होती.