बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैदान’ची (Maidan) रिलीज डेट पुन्हा एकदा बदलली आहे. अजय देवगणने आज सोशल मीडियावर रिलीजची नवी तारीख जाहीर केली आहे. ‘मैदान’ हा चित्रपट पुढील वर्षी 17 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. ज्यामध्ये अजय देवगण ‘अब्दुल रहीम’ची भूमिका साकारत आहे. याआधी हा चित्रपट जून 2022 मध्ये रिलीज होणार होता पण काही कारणास्तव या वर्षी रिलीज पुढे ढकलण्यात आला होता.
अजय देवगणने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘भारताला अभिमान वाटणाऱ्या सय्यद अब्दुल रहीम (Sayeed Abdul Rahim) या अज्ञात नायकाची खरी कहाणी अनुभवा. 17 फेब्रुवारी 2023 रोजी मैदान प्रदर्शित होत आहे. अजय देवगणच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. 13 वर्षे भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक राहिलेल्या सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत अजय देवगणला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे, ज्यांनी ‘बधाई हो’ (Badhai Ho) सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण आता हा चित्रपट फक्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.’मैदान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे.