TOD Marathi

मुंबई:

अभिनेत्री सई ताम्हणकर केवळ मराठी सिनेसृष्टीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही वेगळेपण सिद्ध करत आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून सईने नेहमीच तिचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे.

सईला तिच्या काही सिनेमामधील भूमिकेसाठी विविध पुरस्कारही मिळाले आहे. एक मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करतोय, हे पाहून अनेकांनी या अभिनेत्रीचं कौतुकही केलं आहे. आता तिला या भूमिकेसाठी फिल्मफेअरदेखील (Sai Tamhankar Wins Filmfare Award 2022 for Mimi) मिळाला आहे.

‘मिमी’ सिनेमात सईने ‘शमा’ (Sai Tamhankar as Shama in Mimi) भूमिका साकारली आहे. कृती सेनॉन साकारत असलेल्या ‘मिमी’ या मुख्य पात्राची ती बेस्ट फ्रेंड असते. या दोन्ही कलाकारांसह सिनेमात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरला यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सई यांच्यामधील हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सईला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता रणवीरने तिचा हात हातात घेत तिच्या हातावर किस केलं आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावेळी असणारे सईचे हावभावही कॅमेऱ्यात टिपले गेलेत. यावेळी सई भारावून गेली आहे, थोडीशी लाजली आहे. फिल्मफेअरच्या अधिकृत सोशल मिडीया पेजवर सई आणि रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आलेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)