शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार थोड्याच वेळात पार पडणार आहे. यामध्ये भाजपच्या वतीने 9 मंत्री तर शिंदे गटाच्या वतीने 9 असे एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपने आपल्या बहुतांश ज्येष्ठ नेत्यांना यामध्ये संधी दिलेली आहे. शिंदे गटातून मात्र अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली असली तरी संजय शिरसाट यांना संधी मिळालेली नाही.
शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई यांना स्थान दिलेलं आहे तर भाजपने आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना देखील यामध्ये स्थान दिलेलं आहे. (Shambhuraj Desai, Uday Samant, Gualbrao Patil taking oath as minister)
काल रात्री या संदर्भात शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती, सोबतच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची देखील दुपारी बैठक पार पडली होती. तर अशा या ब्रह्मप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार थोड्याच वेळात होत आहे. (Eknath Shinde, Devendra Fadnavis)
भाजपकडून शपथ घेत असलेले नेते :
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
रविंद्र चव्हाण
विजयकुमार गावित
अतुल सावे
सुरेश खाडे
मंगलप्रभात लोढा
शिंदे गटाकडून शपथ घेत असलेले नेते :
दादा भुसे
उदय सामंत
गुलाबराव पाटील
शंभूराज देसाई
दीपक केसरकर
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
संजय राठोड