अमेरिकेने अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला ( ayman-al-zawahiri-killed ) अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ( Afganistan Drone Attack ) ठार केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( President Jo Biden ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी (31 जुलै) अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने ( CIA ) अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.
“अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने जवाहिरीचे हात रंगले होते. आता लोकांना न्याय मिळाला आहे. हा कट्टरतावादी आता जगात राहिला नाहीये,” असं बायडन यांनी म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीमध्ये उभा होता, तेव्हाच ड्रोनच्या सहाय्याने दोन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. जवाहिरीच्या कुटुंबातील लोकही त्यावेळी घरात उपस्थित होते. मात्र, कोणालाही इजा पोहोचली नसल्याचंही अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
On Saturday, at my direction, the United States successfully conducted an airstrike in Kabul, Afghanistan that killed the emir of al-Qa’ida: Ayman al-Zawahiri.
Justice has been delivered.
— President Biden (@POTUS) August 1, 2022