गेलं काही दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतल्याचं चित्र होतं, मात्र विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी विदर्भात गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्या ठिकाणचा पूर ओसरला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. आता वर्धा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील निधा गावाला पुराने वेढा दिलेला आहे. अन्य काही गावांनाही पुरामुळे पाण्याचा वेढा निर्माण झाला आहे. पुरात जवळपास 400 नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. देवळी आणि सेलू तालुक्यातील काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात करणाऱ्या करण्यात आलेल्या असून रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर राबवण्यात येत आहे.