जळगाव : ‘हॅलो गाइज, आज मैं आत्महत्या करनेवाला हूं, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ हा असा अवघ्या 9 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करत एका २२ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धीरज शिवाजी काळे असं मृत तरुणाचं नाव असून राहत्या घरी त्यानं हे कृत्य केलं. विशेष म्हणजे सकाळपासून अगदी सामान्यपणे वागणाऱ्या धीरजनं असा व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्या का केली? असा प्रश्न आता त्याच्या कुटुंबीयांना पडला आहे.
धीरज हा समाज माध्यमांवर अतिशय सक्रिय होता. त्यानं सकाळी नऊ वाजता इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेऊन आपण आत्महत्या करत असल्याचं व्हिडिओतून सांगितलं. यामुळे त्याच्या मित्रांसह कुटुंबीयांनाही धक्का बसला.
‘एक मॉडेल से मुझे मोहब्बत हुई, मैने शादी के सपने देखे लेकीन वह हो गई किसी और की, नाराज मैने अपने देख लिए, हमने सीखा एकसे मोहब्बत करना, हर किसी को प्यार परोसा नही करते, जिंदगीमे एक बात याद रखना दोस्त, लडकी पर कभी भरोसा नही करते’, अशा आशयाचा डायलॉग धीरजने स्टोरीमध्ये म्हटला होता.