TOD Marathi

400 ते 500 मुंडे समर्थक उद्या BJP च्या पंकजा मुंडे यांना भेटून निर्णय घेणार? ; मोदींनी Pritam Munde यांना मंत्रिपद न दिल्याने सर्मथकांत नाराजी, दिले राजीनामे

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 जुलै 2021 – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. मात्र, यामध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांना त्यात स्थान दिले नाही, तसेच त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले नाही, म्हणून मुंडे समर्थक मोदींवर खूप नाराज आहेत. मुंडे सर्मथकांनी राजीनाम्याचे सत्र जोरदार सुरु केलं आहे. उद्या तर 400 ते 500 मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांना भेटून मोठा निर्णय घेणार आहेत, असे समजत आहे.

प्रीतम मुंडे यांचा विसर या मंत्रिमंडळ विस्तारात मोदी सरकारला पडल्याचे समजत आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना होती. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला, त्यामुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी राजीनामा सत्र सुरु केलं आहे.

सध्या दिल्लीत पंकजा मुंडे असून प्रितम मुंडे यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांनी सुरु केल्यात. तसेच उद्या पंकजा मुंडे दिल्लीतून आल्यानंतर हे कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेणार आहेत, असे समजते.

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून न घेतल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदांचे राजीनामा देण्यास सुरुवात केलीय. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे व युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय.

भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, त्यांच्या या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बीडमधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिलेत. यात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा एकूण 36 जणांनी राजीनामा दिलाय. तर आज 70 जण राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज