TOD Marathi

विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार आता विधान भवनात दाखल होत आहेत. हे होत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना आमदारांची बस ट्रॅफिकमध्ये अडकल्याची माहिती आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसामुळे नेहमीपेक्षा वाहतूक मंदावली असून यामुळे मतदानासाठी पोहोचत असलेल्या आमदारांना उशीर होत आहे. (mlc election 2022)

आदित्य ठाकरे यांसह आमदारांची बस ट्रॅफीकमध्ये अडकल्याची माहिती आहे. या बसमध्ये शिवसेनेचे आमदार आणि आदित्य ठाकरे हे देखील विधान भवनाकडे प्रवास करत आहेत. पण वाहतूक कोंडीमुळे आमदारांना विलंब होत आहे. (Aaditya Thackeray and Shivsena MLA bus in traffic)

आज मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये पावसानंही हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. सकाळी पाऊस सुरू झाल्याने चाकरमान्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय, याचाच फटका आता सेनेच्या आमदारांनाही बसला आहे.