TOD Marathi

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete News) यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. (Vinayak Mete Accident News). या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते 52 वर्षांचे होते.

या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. या अपघाताआधीचा विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचा फोटो समोर आला आहे. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसत आहे. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं, त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. शर्टाच्या खिशाला तिरंगाही होता. चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आलंय. या अपघातामुळे विनायक मेटे यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जातेय.

विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत होते. त्यासाठी मोठा लढा त्यांनी उभा केला होता. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मराठा समाजाच्या काळजाला चटका लागला असल्याची भावना व्यक्त केली जातेय.

अपघातानंतर विनायक मेटे यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्याच्यावर उपचार केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनही याला अधिकृत दुजोरा देण्यात आला. त्यांच्या मेंदूलाही जबर मार बसल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोली इथल्या बातम बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांच्यासह असलेले त्यांचे सहकारीही जबर जखमी झाले होते.  कारचा चक्काचूर झाला होता. पहाटे साडे पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यात आलं. कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयातील क्रीटीकेअरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.