मुंबई : आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची पोलोखोलही करणार असल्याचं देखील कदम म्हणाले. आज दापोलीत शिंदे गटाच्या जाहीर सभेत माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरेंवर कठोर शब्दात प्रहार केला . ( Ramdas Kadam )
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होताना दिसत आहे. दोन्हीकडचे नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरट टीका केली आहे. शंभर खोके घ्यायची सवय कोणाला आहे, याची पोलखोल आजच्या दापोली येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jahav ) यांचा ‘चिपळूणचा नाच्या’ असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली.
रामदास कदमांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली आणि त्यावेळेला ते सातत्याने मीडियाच्या समोर जाऊन डोळ्यामध्ये ग्रीसरीन टाकून ढसाढसा रडण्याचे नाटक करत होते. रामदास कदम यांच्यासारखा खोटा माणूस उभ्या हिंदुस्थानात सापडणार नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती. त्यांच्या या व्यक्तव्याचाही कंदमांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.