आदित्य ठाकरेंनी आधी पुरुषासारखं बोलावं, राणेंनी डीवचलं…

दिल्ली:
शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानावर मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्य आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. अडीच वर्षात कोणाला विचारायला वेळ नव्हता मात्र आता सगळ्यांना विचारत आहेत, असं म्हणताना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)आधी पुरुषासारखा आवाज काढावा असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डीवचलं आहे.

त्यामुळे आधीच दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) निमित्ताने सुरू असलेला संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Please follow and like us: