TOD Marathi

नवी दिल्ली: भारतीय संघाने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या साखळीत ब गटाच्या सामन्यात भारतीय संघाने हंगेरी आणि मोल्डोव्हालच्या संघाला पराभूत केले. १६ गुणांनी पुढे राहून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. माजी विश्वविजेता विश्वनाथ आनंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑलिम्पियाड मध्ये खेळत आहे.

साखळीत झालेल्या नऊ फेऱ्यांच्या शेवटी भारतीय संघ ७ विजय आणि दोन ड्रॉ सह १६ अंकावर आहे. झालेल्या सातव्या फेरीत भारताने हंगेरीला ४-२ ने पराभूत केले. ज्यात विश्वनाथन आनंद, निहाल सरिन आणि कोनेरू हम्पीच्या यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे.

ऑनलाईन पद्धतीने होत असलेली ही स्पर्धा चेन्नई येथून खेळली जात आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनचे सचिव सचिन सिंग चौहान यांनी या विजयबाबत आनंद व्यक्त केला आहे. ‘भारतीय बुद्धिबळ संघासाठी ही चांगली सुरुवात आहे. आमचे ध्येय भारताला बुद्धिबळात जगातील नंबर एकचे राष्ट्र बनवायचे आहे’.अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.