मोठी बातमी!; देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई:विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते घरीच उपचार घेत असून प्रकृती सुखरूप असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

ट्विटरवर फडणवीस म्हणाले की, मला कोरोनाची लागण झाली असून मी सध्या होम आयसोलेशन मध्ये आहे. माझ्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी कृपया आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी सर्वांनी आपली काळजी घ्यावी.

Leave Your Comment