TOD Marathi

शिवसेनेचा दसरा मेळावा नक्की कोण घेणार यावरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP Spokesperson Keshav Upadhye) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डीवचलंय.

दसरा मेळाव ( Dasara Melava ) घेण्याची परवानगी पेंग्विनसेनेला ( Penguin Sena) मिळावी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचा चिमटा काढला. सोबतच बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहतोय, असंही म्हटलंय. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदे गट ( Shivsena VS Shinde ) असा सामना रंगलेला असताना आता भाजपने त्यामध्ये उडी घेतल्याचे चित्र आहे.

गेली अनेक वर्ष शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक पदाधिकारी हे स्वतःला शिवसेना म्हणतात तर उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना म्हणतात. उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या वतीने मुंबई महापालिकेला दसरा मेळाव्या संदर्भात अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील एक अर्ज दिला होता.

शिंदे गटाने दसरा मेळावा घेतल्यास राज ठाकरेंचं देखील भाषण होईल अशाही चर्चा होत्या. त्यामुळे दसरा मेळावा कुणाचा? यावरून आधीच मोठं राजकारण आणि वादविवाद सुरू आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा पुनरुच्चार केला. आणि त्यानंतर केशव उपाध्ये यांनी ट्विट करून शिवसेनेला डिवचलं.

यापूर्वी देखील भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिलं होतं. आता या शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वादात आता भाजपनेही उडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.