स्वतःची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल; नितेश राणेंची सरकारवर टीका

मुंबई: वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच राज्यातील विविध प्रकल्पासांठी मंजूर झालेला निधी यावरून पुन्हा भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे एका कार्टूनमधून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

नितेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक कार्टून पोस्ट केले आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, कामगारांना मिळालेला बोनस आणि वाढती महागाई यातील तफावत दर्शवली आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधी वाटपाचे चित्रही दिसत आहे.

याला अनुसरुन ‘वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री’ असा खोचक टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ‘स्वत:ची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल’ असे म्हंटले आहे.

Leave Your Comment