TOD Marathi

आता तरी कोरोना लसीच्या Booster डोसची गरज नाही – V. K. Paul

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 ऑगस्ट 2021 – केंद्र सरकारने अजून कोरोना लसीच्या बूस्टर डोसचा विचार केला नाही, असे निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा लसीकरणावरील हवाला देऊन सांगितले की, या बाबत अशी कोणतीही शिफारस जारी केली नाही. बूस्टर डोसची वेळ आणि गरज यामागील विज्ञान अजूनही विकसित होत आहे.

कंपन्यांनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर भिन्न आहे. बारकाईने यावर लक्ष ठेवले जात असून संशोधन सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, लसीचे दोन डोस भारतातील प्रौढ लोकसंख्येला देऊन लसीकरण करणे ही आतापर्यंतची मोठी चिंता आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना पॉल म्हणाले, जगातील काही देशांनी बूस्टर डोस देऊन लसीकरण सुरू केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत त्यांनी असेही म्हटले आहे की, या विषयावर अजून कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.