टिओडी मराठी, मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२१ – गणेशोत्सवाकरिता कोकणामध्ये जाणार्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली असून त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावे लागणार आहे.
दरवर्षी मी आपल्यासाठी गणेशोत्सवाकरीता ला बसेस सोडतो. पण, यंदा आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणार आहोत. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदी यांनी कोकणाला आशीर्वाद दिलाय. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत, अशी माहिती नितेश राणे यांनी दिलीय.
१८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले आहे. या प्रवासात एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार आहे.
असे करा बुकिंग –
बुकिंगसाठी प्रवाशांना नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिलेेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री आणि संतोष कानडे यांना २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबदरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे, असेही सांगितले आहे.
Ganpati Bappa Moriya!! pic.twitter.com/bpmTJUI1vQ
— nitesh rane (@NiteshNRane) August 22, 2021