TOD Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदे गट व भाजपच्या सर्व आमदारांसाठी संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) जाणार नसल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत स्वतः आमदार शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणार असल्याची माहिती दिली आहे. सोबतच आपली कसलीही नाराजी नसल्याचं सुद्धा आमदार संजय शिरसाट म्हणाले आहे.

संजय शिरसाट म्हणाले आहे की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला जाणार नसल्याच्या आणि मी नाराज असल्याच्या बातम्या सर्वत्र चालत आहे. पण नाराजीचं कोणतेही कारण नाही. दोन दिवसांपूर्वीचं मी मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे गणपतीचे दर्शन करून जेवण सुद्धा केलं. त्यामुळे आज जाणार नव्हतो, मात्र मी नाराज असल्याच्या बातम्या सुरु असल्याने मला जावे लागणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला (Dinner at CM Residence) मी जाणार असल्याचं शिरसाट म्हणाले आहे.