TOD Marathi

मुंबई : ‘धर्मवीर’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला सलमान खानसह सिनेसृष्टीतील रितेश देशमुख, अमिषा पटेल आणि अन्य कलाकार उपस्थित होते. शिवसेनेचे प्रमुख नेतेही यावेळी उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती अर्थातच या कार्यक्रमाला होती.

सध्या सगळीकडे प्रसाद ओकच्या धर्मवीर सिनेमाची चर्चा सुरु असताना एक व्हिडिओही चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ आहे संजय राऊत आणि अमिषा पटेल यांच्या भेटीचा. स्वतः अमिषाने या ट्रेलर लाँच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती व्यासपीठावर जाताना तिला संजय राऊत दिसतात. यानंतर ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना भेटते.

यानंतर राऊतही तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. काही क्षण त्यांच्याशी बोलून ती पुढे निघते. आमिषाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. या व्हिडिओत अमिषाने संजय यांनाही टॅग केलं आहे.