स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

पुणे:
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमानिमित्त आज पुण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासंदर्भात स्मृती इराणी यांचा आज दौरा आहे मात्र त्या कार्यक्रमापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महागाई विरुद्ध आंदोलन केलं. यामुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे.

दरम्यान स्मृती इराणी यांच्या या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने वाढत्या महागाईविरोधात निषेध व्यक्त करत चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढत्या महागाईवरून जाहीर निषेध केला. मात्र यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं, दरम्यान त्यांच्याशी झटपट झाली. स्मृती इराणी हॉटेलवर पोहचण्यापूर्वी त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

Leave Your Comment