टिओडी मराठी, लंडन, दि. 27 मे 2021 – मागील वर्षभरापासून जग कोरोनाने त्रस्त झाले आहे. कोरोनाच्या साथीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत करून लस शोधली. कोरोना लसचा पहिला डोस घेणारा जगातील सर्वात पहिले पुरुष असलेल्या 81 वर्षीय विलियम शेक्सपियर यांना देण्यात आला होता. त्यांचं नुकतंच निधन झालं त्यांना अन्य आजार होते, असे सांगण्यात आलं आहे. विलियम शेक्सपियर यांच्या मागे त्यांच्या पत्नी जॉय, दोन मुलं, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
विलियम शेक्सपियर यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात Pfizer BioNTech ची कोरोना लसीचा डोस घेतला. जगात कोरोना लसचा पहिला डोस घेणारे विलियम हे सर्वात पहिले पुरुष होते. विलियम यांच्या काही मिनिटांअगोदर यूनिवर्सिटी रुग्णालयात ९१ वर्षीय मार्गरेट कीनन यांनी कोरोनाची लस घेतली होती. याबाबत एका इंग्रजी दैनिकाने त्यांच्याबद्दल वृत्त दिलं आहे.
यानुसार शेक्सपियर यांचे मित्र कोवेन्ट्रीचे नगरसेवक जेने इन्स यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी विलियम शेक्सपियर यांचे निधन झाले. शेक्सपियर यांना अनेक गोष्टींसाठी ओळखलं जातं. त्यात शेक्सपियर हे जगातील पहिले पुरुष आहेत ज्यांनी सर्वात अगोदर कोरोनाची लस घेतली. माझ्या मित्राला श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी लसीकरण करावं, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यूनिवर्सिटी रुग्णालयाने म्हंटले की, शेक्सपियर यांचे निधन स्ट्रोक आल्याने झाले आहे. शेक्सपियर यांनी पॅरिश येथे नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली. याच हॉस्पिटलमध्ये विलियम यांनी कोरोना लसचा पहिला डोस घेतला होता आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहिल्या लसचा डोस घेतल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले होते.
वेस्ट मिडलैडस लेबर ग्रुपने सांगितले की, शेक्सपियर यांना बिल नावानंही ओळखत होते. कोविड १९ लसीकरणानंतर जागतिक स्तरावर त्यांचे नाव झालं होतं. पक्षासाठी त्यांनी अनेक दशकं सेवा केलीय. कामगार पक्षाचे नेते म्हणून त्यांना मान्यता होती. या दुखा:च्या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबीयासोबत आहोत.