सध्या राज्यात अनेक नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आमदार संतोष बांगर, संदिपान भुमरे, रामदास कदम यांच्या कार्यकर्त्यांसह संवादाच्या व्हायरल व्हिडिओमुळे गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. (Viral Video of Politicians)
मात्र, आता राज्याच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एका कामाच्या गुणवत्ते संदर्भात यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दिसल्या. मी एक रुपया घेत नाही तुमच्याकडून, जर काम क्वालिटीचं झालं नाही तर डोकंच फोडीन असेही यशोमती ठाकूर यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे.
यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. (Congress Leader Yashomati Thakur) यशोमती ठाकूर यांचा आक्रमक बाणा या व्हिडिओमध्येही पाहायला मिळाला.