Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi - लोकांकडून लोकांसाठी टॉप मराठी बातम्या

TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 जुलै 2021 – देशामध्ये आज 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी या दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन केलं आहे. कारगिलच्या उंच शिखरांवर 1999 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. भारताने ज्यात विजय मिळवला होता.

राष्ट्रपती आणि सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद आज यानिमित्त द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल इथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते. मात्र, खराब हवामानामुळे हा कार्यक्रम रद्द केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद गुलमर्गला जात आहेत, तिथे ते जवानांशी संवाद साधणार आहे.

द्रासमध्ये कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत व लष्कराच्या उत्तरी विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी आणि लेह येथील 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन उपस्थित राहणार होते.

जम्मू-काश्मीर व लडाखच्या चार दिवसांच्या दौर्‍याचा भाग म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी येथे दाखल झालेत. राष्ट्रपती सोमवारी लडाखमधील द्रास शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते.

पण, खराब हवामानामुळे हा कार्यक्रम रद्द केला आहे. याअगोदर 2019 च्या सुरुवातीला खराब हवामानामुळे कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होऊ शकले नव्हते.

भारताच्या इतिहामधील कारगिल युद्ध ही एक महत्वाची घटना आहे. भारताने या युद्धामध्ये पाकिस्तानला हरवून विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जात आहे.

कारगिलच्या उंच शिखरांवर 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. भारताने यात विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकामध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला जातोय. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती.

14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना हुस्कावाले. या युद्धात आपले 500 सैनिक शहीद झालेत. हे युद्ध लष्करी इतिहासात एक अतिशय कठीण व धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये म्हटले होते की, 26 जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य व संयमाचे असे प्रतीक आहे, जे जगाने पहिले आहे. यंदा हा गौरवास्पद दिवस अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, ते म्हणाले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज