TOD Marathi

मुंबई :

गेल्या पंधरा वर्षांपासून फुले-शाहु-आंबेडकरी विचार सगळीकडे पोहोचवणाऱ्या वक्त्या आणि मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत (Uddhav Thackeray Shivsena) प्रवेश केलां. सुषमा अंधारे यांच्या रुपाने शिवसेनेला सभा गाजवणाऱ्या आक्रमक नेत्या मिळाल्या आहेत. ठाकरे कुटुंब कठीण परिस्थितीत असताना एक बहीण म्हणून आपण त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. पक्षप्रवेश करताना सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Sushma Andhare joins Shivsena in presence of Uddhav Thackeray)

सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत ठाकरे कुटुंबियांचा साधेपणा सुषमा अंधारे यांना कमालीचा भावला होता. शिवसेना पक्षप्रवेशामागे मला काहीतरी मिळेल, अशी माझी अपेक्षा नाही, असंही आज सुषमा अंधारे यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहीर हे प्रामुख्याने उपस्थित होते. (Aadutya Thackeray, Neelam Gorhe, Sachin Ahir were present)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचे पक्षात स्वागत केलं. संकटाच्या काळात सोबत असणारे खरे सहकारी असतात. नीलम ताई आमच्यासोबत कायमच खंबीरपणे उभ्या राहिल्या, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांचं देखील यावेळी कौतुक केलं. (Uddhav Thackeray appreciated Dr. Neelam Gorhe) तुमच्या सर्वांच्या सहकार्याने राज्यभरात विशेषतः ग्रामीण भागातही महिलांना शिवसेनेत नेतृत्व करण्याची संधी देऊया, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सुषमा अंधारे यांच्या वतीने उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. सोबतच त्यांना भारतीय संविधानाची एक प्रतही देण्यात आली, तेव्हा त्यावर भाष्य करताना याच संविधानानुसार बंडखोर आमदार बरखास्त होणार आहेत, असा जोरदार निशानाही उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर लगावला.