TOD Marathi

मुंबई : सरसेनापती हंबीरराव या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. दिग्दर्शक प्रविण तरडे चित्रपटात सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका साकारत असून येत्या २७ मे रोजी चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

टिझर प्रदर्शित झाल्यानंतरच सरसेनापती हंबीरराव चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. मराठीतला हा चित्रपट बिग बजेट असणार असल्याचं सूतोवाचही तरडे यांनी याआधीच दिले आहेत. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दमदार ग्राफीक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट पहायला मिळत आहेत.

दरम्यान प्रविण तरडे यांच्या पत्नीनेही चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. लाॅकडाऊनमुळे बरेच दिवस रखडलेला सरसेनापती हंबीरराव आता २७ मेला बिग स्क्रिनवर पहायला मिळणार आहे.