PM Narendra Modi 2 ऑगस्ट रोजी लाँच करणार डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI ; व्यवहार होणार Cashless

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 ऑगस्ट 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी (दि. 2 ऑगस्ट रोजी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे e-RUPI डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच करणार आहेत. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर असून जे NPCI ने विकसित केलं आहे. यामुळे पेमेंट पूर्णपणे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहार होतील.

e-RUPI क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगवर आधारित ई-व्हाउचर म्हणून काम करते. जे लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनवर वितरित केलं जात आहे. e-RUPI प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप्स किंवा इंटरनेट बँकिंग प्रवेश न घेता व्हाउचरचे भुगतान करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

हे डिजिटल प्लॅटफॉर्म हे सुनिश्चित करते की, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सेवा प्रदात्याला पेमेंट केले जात आहे. प्रीपेड असल्याने ते कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय सेवा प्रदात्याला वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन देत आहे.

यामुळे व्यवहार कॅशलेस होण्यास आणखी मदत होणार आहे. सध्या अनेक लोक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर अधिक प्रमाणात करत आहेत.

Leave Your Comment