पाटणा :
महाराष्ट्रात नवीन सरकार शपथ घेत असताना बिहारमध्ये (Bihar) मात्र भाजप आणि युतीचे सरकार कोसळत होतं. भाजपसोबत फारकत घेत बिहारमधील महागठबंधनच्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार (Nitish Kumar) तर उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) शपथ घेणार आहेत. बुधवारी दुपारी 2 वाजता राज्यपाल फागू चौहान (Phagu Chauhan) यांच्या हस्ते शपथविधी होईल.
नितीशकुमार यांच्या नव्या सरकारचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. मात्र याची घोषणा करण्यात आलेली नाही.
नव्या सरकारमध्ये सामान्य प्रशासन आणि गृहखात्यावर अद्याप एकमत झालेले नाही. नितीश कुमार यांच्या पसंतीचे गृह खाते राजदला हवे आहे. मात्र, रस्ते बांधकाम विभाग, आरोग्यासह अनेक मोठी खाती राजदला दिली जाऊ शकतात.
दरम्यान एनडीएपासून (NDA) वेगळे होऊन राजदसोबत सरकार स्थापन करणाऱ्या नितीशकुमार यांच्या विरोधात भाजपच्यावतीने आज प्रदेश कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या दिल्लीत पंतप्रधानांसोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला देखील नितीश कुमार यांनी हजेरी लावली नव्हती, तेव्हापासून नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.