TOD Marathi

वाराणसी: ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर आता कोर्टानं यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शिवलिंग सापडलेली जागा सील व सुरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

ज्ञानव्यापी मशिद सर्व्हेक्षणाचा शेवटचा दिवस होता. सर्व्हेक्षणाचा शेवटच्या दिवशीच विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला. त्यानंतर मशिदीत सापडलेले शिवलिंग सुरक्षित ठेवण्यासाठी वकिल हरिशंकर जैन यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतील मुद्द्यांवर अभ्यास केल्यानंतर खंडपीठाचे मुख्य न्यायाधीशांनी याचिका स्वीकारली आहे. त्याचबरोबर प्रशासनाला शिवलिंग सापडलेली जागा त्वरित सील व संरक्षित करण्याचा आदेश दिला आहे.

कोर्टाने हरिशंकर जैन यांची याचिका दाखल करुन घेतल्यानंतर वाराणसीच्या जिल्हा दंडधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडलं आहे. ते ठिकाण तातडीने सील करा. त्याचप्रमाणे, सील करण्यात आल्यानंतर तिथे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, यांनी मशिदीची जागा संरक्षित व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, असंही आपल्या आदेशात म्हटलं आहे.