टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 7 मे 2021 – पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूधसंघ निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील गटाने विजय मिळवला. त्यानंतर पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केलीय.
कोल्हापूर येथे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर विजय मिळविला आहे. आता यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याबाबत आज नूतन संचालकांसोबत बैठक झालीय. त्यात निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणाराय. दोन महिन्यांत दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. किमान दोन संचालक गोकूळच्या दूध रोज मुख्य कार्यालयामध्ये उत्पादकांना भेटणार आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली होती.
अखेर गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने हरवले. येथे एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकीत अनेक आश्वासने इच्छुक उमेदवारांच्या पक्षांनी दिली गेली. तरीही सभासदांनी मतदानाद्वारे योग्य कौल दिला आहे.
आता प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यानंतर ती पूर्ण करण्याचे आश्वासन देत गोकुळ संघ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार आहे, अशी पहिली घोषणा सतेज पाटील शुक्रवारी यांनी केलीय.