TOD Marathi

इंधन टंचाई अन महागाईमुळे Germany मध्ये तयार केला Electric Highways ; 1 Kilometer रस्त्यासाठी येतोय सुमारे 22 कोटीचा खर्च

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, बर्लिन, दि. 6 ऑगस्ट 2021 – पेट्रोल – डिझेल या इंधनाची टंचाई आणि महागाई तसेच पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेऊन जर्मनी देशाने वाहतूक आणि दळणवळणासाठी आता ई हायवे तयार केले आहेत. या हायवेवरून ट्रक किंवा इतर वाहने चालवताना विद्युत तारामधील विजेचा वापर इंधन म्हणून केला जाणार आहे. मात्र, केवळ एक किलोमीटर या रस्त्यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च येत आहे.

ज्याप्रमाणे विजेचा वापर करून रेल्वे चालवल्या जात आहेत, त्याचप्रमाणे रस्त्यावरील विजेचा वापर करून हे ट्रक चालवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर अशाप्रकारे पाच किलोमीटर लांबीचा एक इलेक्ट्रिक हायवे तयार केला आहे.

फ्रँकफर्ट शहरा पाशी हा प्रयोग केला आहे. या पाच किलोमीटरच्या हायवेवर दररोज वीस मोठे ट्रकची नोंद ठेवली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर सर्वत्र हायवेवर अशाप्रकारे विजेचा वापर करणे शक्य आहे.

ट्रक वाहतुकीमुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या प्रयोगाचे स्वागत केले जात आहे. हा प्रयोग जर प्रत्यक्षात आणायचा असेल तर हायवेवर सर्वत्र विजेचे खांब उभे करून तेथे विजेच्या तारा ओढाव्या लागतील.

जर्मनीत सुमारे चार हजार किलोमीटर लांबीचा हायवे आहे, असे हायवे तयार केले तर, जर्मनीतील 60 टक्के वाहतुकीचा प्रश्न निकालात निघणार आहे.

या प्रकारे एक किलोमीटर हायवे तयार करण्यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी ट्रकमध्ये लावावी लागणारी यंत्रणा ही अतिशय सोपी आणि सुलभ आहे. देशातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सिमेंस यांनी या प्रयोगासाठी पुढाकार घेतलाय.