नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Defence Minister Rajnath Singh) यांनी संरक्षण दलांसाठी ( Defence )_नव्या अग्निपथ भरती योजनेची ( Agnipath Scheme ) घोषणा केली आहे. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ ( Tour Of Duty ) असे नाव देण्यात आलंय. दोन आठवड्यांपूर्वी नौदल (Navy), लष्कर (Army) आणि हवाई दलाच्या (Air Army ) प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi ) यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती. लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे. चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे.
“सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने आज ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.