मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताचं ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. १३ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनेक कलाकारांनी पहिला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरला देखील हा चित्रपट पाहिल्यानंतर राहावलं नाही आणि तिने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसादचं कौतुक केले आहे.
View this post on Instagram
अमृता खानविलकरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि कॅप्शन मध्ये लिहिले, “भेटला विठ्ठल.प्रिय प्रसाद गेल्या काही महिन्यांची गडबड धावपळ तुला माहितीच आहे. तेव्हा ‘धर्मवीर’ बघायला उशीर झाला त्यासाठी माफी मागते. पण कलाकृती अजरामर असेल तर ती कधीही पाहिली तरी ती तितकीच प्रभावी असते. काल ‘धर्मवीर’ पाहिला. प्रसाद ओक शोधत होते पण तो कुठेच सापडला नाही. सापडले ते दिघे साहेब. मी त्यांना कधी पाहिलं नाही भेटले नाही. पण काल ते ही घडलं असं वाटलं. ते डोळे, हावभाव, बोलणं, ते समर्पण तुझ्यासारख्या नटालाच हे जमू शकलं असतं आणि तू त्याचं सोनं केलंस.”
चंद्रमुखी चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे काल अमृताने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पहिला. चित्रपट पाहिल्यानंतर अमृताने प्रसादच्या कामाचे चांगलेच कौतुक केले आहे. अमृतच नाही तर अनेक कलाकारांनी देखील प्रसादचे कौतुक केलें आहे.