मुंबई : शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमधील सुरत येथे ली मेरिडियन या हॉटेलमध्ये आहेत. त्यांना भेटण्यासाठी आता शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक पोहोचले आहेत. जवळपास दहा मिनिटाच्या खोळंब्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या गाडीला आत सोडण्यात आले आहे. (Milind Narvekar to meet Ekanath Shinde in Surat)
शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर यांच्यासह रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करण्यासाठी ‘ली मेरिडियन’ हॉटेल मध्ये दाखल झाले आहेत. माध्यमकर्मींची देखील मोठी गर्दी त्या ठिकाणी आहे. (Shivsena leader Ekanath Shinde in Gujrat)
आता शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांची शिष्टाई फळाला येईल का? उद्धव ठाकरे यांनी पाठवलेला निरोप एकनाथ शिंदे स्वीकारतील का? या सर्व प्रश्नांची उकल एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक यांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. (Milind Narvekar Ravindra Fatak in Surat, Gujrat)