पुणे :
‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चन है’ असा जोरदार डायलॉग राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारची तुलना त्यांनी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी केली. राष्ट्रवादीशी संबंधित अपक्ष आमदारांची मतं महाविकास आघाडीला का मिळाली नाहीत, यावर आम्ही चर्चा करणार असल्याचंही सुळेंनी सांगितलं. त्या पुण्यात बोलत होत्या. (Supriya Sule in Pune)
भारतीय जनाता पक्षाला शुभेच्छा. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की आम्ही रिस्क घेतली होती. परंतु त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते इनटॅक्ट राहिली आहेत. मात्र जे अपक्ष आमच्यासोबत नव्हते, ते आमच्यासोबत आले नाहीत. राष्ट्रवादीशी संबंधित आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांचे मत मिळाले नाही, याबाबत आम्ही बसून चर्चा करणार आहोत, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है.” आमचे नेते पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्ष ते विरोधात होते, तर अर्धी वर्ष सत्तेत, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
यावेळी बोलताना, प्लास्टिकमुळे फार अडचणी होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकतो का, कचऱ्याचं काही काही करु शकतो का, याचा देखील आम्ही विचार करत आहोत, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली. सिंहगड रोडवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच आम्हा सगळ्यांचं बोलणं झालं आहे, असंही सुळेंनी सांगितलं.