राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसकडूनही आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap)आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांच्या आदेशनुसार या दोघांच्या नावांना मान्यता दिली आहे, तसं पत्र काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी काढले आहे.
भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यासह काँग्रेसमध्ये सचिन सावंत, मोहन जोशी, अतुल लोंढे यांच्या नावाची देखील चर्चा होती मात्र पक्षाने अखेर भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.