मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकतीच पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेचा दर्जा ‘वाय प्लस’ कायम ठेवण्यात आला आहे मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याच्या धमकी पत्र आलं होतं. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा वाय प्लस हा सुरक्षा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे मात्र एक पोलीस अधिकारी आणि एक अंमलदाराची यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Leave Your Comment